माझा कल्पनेतून आणि कोरावरील अनेक समविचारी (वेड्या??) लोकांच्या प्रयत्नातून आकारास येणारी “आषाढी व्हेंचर्स” ही एक “सोशल स्टार्टअप” आहे. सोशल मीडियावर स्टार्टअप असा हा पहिलाच प्रयोग आहे. हो प्रयोगच म्हणायला हवा..

आम्हाला … आणि तुम्ही सामील झालात तर आपल्याला… प्रत्यक्ष एक सोशल स्टार्टअप उभारायचा असून त्यात सोशल कॅपीटल, सोशल एफर्ट, सोशल बेनीफीट हे तिन विषय साध्य करायचे आहेत. आणि हे तिनही “सोशल” असल्याने ते कुणी एकटा करू शकणार नाही. जितके जास्त सहकारी तितकी जास्त चांगली ऍक्टीव्हिटी! हा आपण प्रत्येकाने करायचा विषय आहे. आपला प्रत्येकाचा ह्यात समान सहभाग असणार आहे.. आणि ह्याच्या यशापयशासाठी आपण सारे समान जबाबदार आणि भागीदार असणार आहोत.. हा अशा प्रकारचा पहीलाच प्रयोग आहे जो तुम्ही मी आपण सारे एकत्र येऊन घडवतोय.. तेव्हा आपण जे काही करणार ते “मॉडेल” म्हणून जगात प्रसिद्ध होणार आहे.. आपण केलेल्या चुका देखील अभ्यासाचा विषय असेल..

ही कुठलिही नेटवर्क मार्केटींग कंपनी नाही की कुठली पटकन श्रीमंत होण्याची स्किम नाही. किंबहुना ही पैसे मिळवण्याची संधीच नाही. स्टार्टअप ही आपल्या कुवतीचा अंदाज घेऊन, अत्यंत माफक रिस्कमधे आपण काय करू शकतो हे स्वत:च तपासायची एक आगळी पद्धत आहे. हे देखील लक्षात घ्या की, हा अशा प्रकारचा पहीलाच प्रयोग असल्याने आयडीया काही फुलप्रुफ नाही. पण ह्यालाच सोशल एक्सपरीमेंट म्हणातात. आपण सर्वांनी मिळून एकदिलाने, एकमेकांना सेफ करून, पॉझीटिव्हली हा प्रयोग यशस्वी करायचा आहे.. आणि हा केवळ कोराच नाही, सोशल मिडीयावरचा सर्वात वेगळा प्रयोग ठरेल..

आपण जो करतोय तो एक Social Experiment आहे.. म्हणजे सामाजीक प्रयोग! विवीध विभागातील लोकांनी एकत्र येऊन काहीतरी विधायक करायचे असे साधे सोपे ह्याचे स्वरूप आहे… कुठलाही प्रयोग, आयडीया छोटी किंवा सोपी असली म्हणून फालतू नसते.. आपण कशा प्रकारे तिला प्रसारीत करतो, इंप्लिमेंट करतो ह्यावर बरेच अवलंबून आहे.. छोटे उदाहरण झुकरबर्गच्या फेसबुकचे.. सोपा विषय की तुम्ही काहीही करत असाल तरी एखादा फोटो काढा आणि शेअर करा.. पाहता पाहता ती जगातील सर्वात मोठी आणि प्रभावी कंपनी झाली.. आयडीया जितकी सोपी, साधी, सरळ तितकी ती प्रभावी होत जाते.. तिचा व्याप वाढत जातो.. तर आपल्या सोशल एक्सपरीमेंट मधे आपण साध्य करण्याच्या प्रयत्नात आहोत – सोशल इंटरप्रेनरशीप… म्हणजे नक्की काय??

समुहाने एकत्र येऊन.. ज्याला जे जमेल तसा सहभाग करून.. काहीतरी व्यवसाय करायचा आणि त्यातून सर्वांचा त्यांनी केलेल्या कामाच्या/व्यवाच्या प्रमाणात फायदा करून घ्यायचा ह्याला म्हणतात सोशल इंटरप्रेनरशीप ..

म्हणायला गेले तर खूप कठीण.. सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतील.. कुणाचे contribution, effort मोजणार कसे? कोण मोजणार.. फायदा नक्की कोण कसा वाटणार.. मला काय मिळणार.. सेक्युरिटी काय?? हे सारे एका अनंत चर्चेचा भाग आहे. ह्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मुख्य कंपनीच्या पानाला भेट द्या : “आषाढी व्हेंचर्स” प्रश्न विचारा, शंका उपस्थित करा… आणि सक्रीय सहभाग घ्या..

Leave a Reply